कार्तिक आर्यनच्या जागी आता अक्षय कुमारची दोस्ताना 2 मध्ये वर्णी?


निर्माता, दिग्दर्शक करण जोहरचा ‘दोस्ताना 2’ चित्रपट तयार होण्याआधीच चर्चेत आला आहे. या चित्रपटातून नुकतेच अभिनेता कार्तिक आर्यनची हकालपट्टी करण्यात आली होती. सोशल मीडियावर देखील त्याची मोठी चर्चा झाली होती. यावरुन करण जोहरवर अनेकांनी टीकासुद्धा केली होती. त्यानंतर या चित्रपटात आता कार्तिकची जागा कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष ागले होते.

पण आता कार्तिक आर्यनच्या जागी अभिनेता अक्षय कुमारची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. अक्षय कुमार आणि करण जोहर खूप चांगले मित्रसुद्धा आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ‘दोस्ताना 2’ च्या टीममध्ये सहभागी होण्याची विनंती अक्षय कुमारला करण्यात आली आहे. करण जोहर हा कार्तिकला चित्रपटातून काढल्यानंतर मोठ्या संकटात आहे. कारण चित्रपटाच्या शूटिंगवर आधीच खूप पैसे खर्च करण्यात आले आहेत. अक्षयसाठी आपल्या स्टोरीमध्ये बदल करण्यासही करण तयार आहे. कारण आधीची स्टोरी कार्तिक आर्यनला समोर ठेऊन लिहिली गेली होती. पण अजूनही याबद्दल टीमकडून कोणतीच खात्रीशीर माहिती आलेली नाही.

‘दोस्ताना 2’ ही एक कॉमेडी लवस्टोरी असणार आहे. 2008 मध्ये आलेल्या ‘दोस्ताना’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. दोस्तानामध्ये प्रियंका चोप्रा, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि बॉबी देओल यांच्या भूमिका होत्या. तर ‘दोस्ताना 2’ मध्ये जान्हवी कपूर आणि लक्ष लालवाणी यांच्या भूमिका आहेत. पण या चित्रपटात लक्ष आणि जान्हवी बहीणभावाच्या भूमिकेत असणार आहेत. त्यामुळे मुख्य पात्र कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.