डोळे स्कॅन करून रेशन देणारे पहिले राज्य ठरणार हिमाचल

फोटो साभार टाईम्स ऑफ इंडिया

करोना मुळे अनेक गोष्टी वाईट घडत आहेत हे खरे असले तरी त्यामुळे नवनवीन शोध सुद्धा लावले जात आहेत हेही खरे. हिमाचल प्रदेशात स्वस्त धान्य दुकानातून रेशन धान्य देण्यासाठी आता डोळे स्कॅन करण्याची पद्धत वापरली जाणार असून हिमाचल असा उपक्रम राबविणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार करोना काळात सोशल डीस्टन्सिंग आवश्यक ठरले आहे. हिमाचल मध्ये रेशन देण्यासाठी पॉस मशीन वापरली जात आहेत. पण येथेही मशीनवर बोट ठेऊन मगच रेशन दिले जाते. हे मशीन बोटाचे स्कॅनिंग करत नाही. शिवाय अनेकदा ही मशीन खराब होतात. शिवाय प्रत्येकाने बोट टेकायचे म्हणजे करोना प्रसार भीती आहे.

यामुळे आता डोळ्याचे स्कॅनिंग करून रेशन दिले जाणार आहे. त्यासाठी निविदा मागविल्या गेल्याचे खाद्यान्न विभागाचे प्रमुख रामकुमार गौतम यांनी सांगितले. ते म्हणाले, हे मशीन मोबाईल सारखेच आहे. स्कॅनिंग करताना ग्राहकाच्या डोळ्यापासून ठराविक अंतरावर ते धरले जाईल. त्यानंतर स्क्रीन वर कुटुंबातील सदस्यांची नावे आणि त्याचा रेशन कोटा येईल. त्यानुसार धान्य वितरण केले जाईल. एका कुटुंबातील तीन सदस्याचे स्कॅनिंग करून ठेवण्याची सुविधा यात मिळणार आह