या कंपनीला हवाय कुत्रा अधिकारी, पगार १५ लाख

करोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली असून अनेक देशांतील कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. या पार्श्वभूमीवर एका कंपनीने त्यांना हव्या असलेल्या अधिकाऱ्यांबाबत दिलेली जाहिरात विशेष नवलाची ठरली आहे. या कंपनीला जबाबदार अधिकारी म्हणून कुत्र्याची नेमणूक करायची आहे आणि त्यासाठी २० हजार डॉलर्स म्हणजे १५ लाख पर्यंत पगार देण्याची तयारी कंपनीने दाखविली आहे.

अमेरिकन बियर कंपनी बुश बियर असे या कंपनीचे नाव आहे. त्यांना असा कुत्रा अधिकारी म्हणून हवा आहे जो बियरचा स्वाद चाखण्यात निष्णात असेल. चीफ टेस्टिंग ऑफिसर या पदावर कुत्र्याची नेमणूक केली जाणार आहे. त्याने बिअरचे नव नवे स्वाद चाखायाचे आहेत. त्यानुसार कंपनी फ्लेवर्स वर आणखी संशोधन करू शकणार आहे. याची मदत कंपनीला उत्तम चवीची पेये बनविण्यासाठी होणार आहे.

कंपनीने त्यांच्या ट्विटर पेजवर व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे. प्रेस रिलीजही दिला आहे. या पोस्ट साठी निवड होणाऱ्या कुत्र्यावर मोठी जबाबदारी असेल. त्यानेच क्वालिटी कंट्रोलची काळजी घ्यायची आहे शिवाय तोच कंपनीचा ब्रांड अँबेसीडर असणार आहे. या पोस्ट साठी अर्ज करताना काही नियम आहेत. Busch CTO contest नुसार हे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करताना मालकाने त्याचेच कुत्रे या पदासाठी कसे योग्य हे सांगायचे आहे. २८ एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. सोशल मीडियावर ही जाहिरात वेगाने व्हायरल झाली असून अनेकांनी त्याच्या कुत्र्यांना ही नोकरी मिळावी अशी आशा व्यक्त केली आहे.