नाशिक दुर्घटनेवरुन संतापले राज ठाकरे… म्हणाले


मुंबई – नाशिकच्या मनपा रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील ट्विट करत शोक व्यक्त करत दोषींवर कडक शासन करण्याची मागणी केली आहे.


ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे, पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवे, असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.