कुणी कितीही आदळआपट करो, हा संजय काकडे सापडणार नाही


पुणे: तळोजा कारागृहातून कुख्यात गुंड गजा मारणे याच्या काढलेल्या मिरवणुकीप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर शिवाजीनगर सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर कुणी कितीही आदळआपट करो, हा संजय काकडे सापडणार नसल्याची नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

संजय काकडे यांच्या गाड्या गजा मारणेच्या मिरवणुकीत असल्याच्या माहितीवरुन पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांना अटक करण्यात आली होती. आज दुपारी संजय काकडे यांना न्यायालयात हजर केले गेले. संजय काकडे यांना शिवाजीनगर सत्र न्यायालयाने 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

न्यायालयातून जामीन मिळाल्यावर भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच बरोबर हे राजकारण महानगरपालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केले जात असल्याचा आरोप केला आहे.