नाशिक दुर्घटना : निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? -प्रवीण दरेकर


मुंबई – ऑक्सिजन अभावी नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही दुर्घटना ऑक्सिजन टाकीत गळती झाल्यामुळे घडली. रुग्णालयात १५० रुग्ण दाखल होते. यातील व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ जणांपैकी २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? अशी विचारणा विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.


निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्‍यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले, असे ट्विट प्रवीण दरेकर यांनी केले आहे. त्याचबरोबर तत्पूर्वी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी मनपा आयुक्तांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.