लोकसंख्या नियंत्रणावर ट्विट करून तोंडघशी पडली कंगना


आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे अभिनेत्री कंगना राणावत कायमच चर्चेत असते. यावेळी तिने लोकसंख्या नियंत्रणाबाबत ट्विट केले आहे. ज्यांना तीन मुले आहेत, त्यांना तुरूंगवासाची शिक्षा झालीच पाहिजे, असे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तिसरे मुल जन्माला आल्यास दंड आणि तुरूंगवास झालाचं पाहिजे अशी मागणी देखील कंगनाने केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे ती ट्रोल होत असून यावर तुला दोन भाऊ-बहिण आहे असल्याची आठवण देखील नेटकऱ्यांनी करून दिली आहे.


कंगना याबाबत ट्विट करत म्हणाली, लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला कठोर कायदे करण्याची गरज आहे. हे सत्य आहे, इंदिरा गांधी निवडणूक हारल्या होत्या. त्यानंतर त्यांची हत्या देखील झाली होती. कारण त्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. जर तिसरे मुल झाले, तर दंड आणि तुरूंगवास झालाच पाहिजे.

तिच्या या ट्विटनंतर तिला तुफान ट्रोल करण्यात येत आहे. कॅमेडियन सलोनी गौरने कंगनाच्या भावंडांचा फोटो स्क्रिनशॉट काढून पोस्ट केला आहे. सध्या कंगनाचे हे ट्विट तुफान चर्चेत आहे. नेटकरी देखील तिला तुफान ट्रोल करत आहेत.