विनयभंगप्रकरणी अभिनेता विजय राजला उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा


मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बॉलिवूड अभिनेता विजय राज यांना विनयभंग प्रकरणात अंतरिम दिलासा दिला आहे. 2020 साली ‘शेरनी’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान हॉटेल रूममध्ये एका सहाय्यक दिग्दर्शक महिलेशी छेडछाड केल्याचा आरोप अभिनेता विजय राज याच्यावर करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात गोदिंया जिल्ह्यातून विजय राजला देखील करण्यात आली होती. काही वेळाने त्याला जामीन देखील मिळाला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामार्फत एक आठवड्यापूर्वी विजय राज याच्यावर विनयभंग प्रकरणात केलेल्या तक्रारीनुसार याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर सुरू असलेल्या खटल्याच्या कारवाईवर स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. आता विजय राज याच्यावर या प्रकरणी गोंदिया येथे कोणतीही ट्रायल चालणार नाही.

विजय राज याच्या वकील सवीना बेदी यांनी या प्रकरणाबाबत दिलेल्या माहितीनुसार, नागपुर खंडपीठाच्या आदेशानंतर विजय याच्यावर गोंदियात ट्रायल होणार नाही, तसेच गोंदियाचे पोलीस त्याना या प्रकरणाच्या चौकशीकरिता बोलवू देखील शकणार नाहीत.

3 नोव्हेंबर 2020 रोजी विजय राजविरोधात गोंदियातील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. विजय राज याने या तक्रारीनंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही ‘शेरनी’ चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाची शूटिंग मध्य प्रदेशात सुरु होती, त्यावेळी विजय राजवर चित्रपटाशी संलग्न एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता.

या प्रकरणात विजय राज याचे नाव जोडताच त्याला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तसेच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी समिती नेमली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.