श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवे यांचे निधन


पुणे : श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवे यांचे पुण्यात निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी महेंद्र पेशवे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती उपचारादरम्यान खालावली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

बाजीराव पेशवे यांचे श्रीमंत महेंद्र पेशवे हे 9 वे वंशज होते. पुणे शहरातच त्यांचे वास्तव्य होते. तसेच ते महाराष्ट्रातील राजघराण्यांना एकत्र आणत स्थापन करण्यात आलेल्या हिंदवी स्वराज्य महासंघाचे कार्याध्यक्ष होते. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना महेंद्र पेशवे यांनाही कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्यांचे निधन झाले.