एका चार्ज मध्ये १०० किमी धावणार ही इलेक्ट्रिक सायकल

भारताची प्रमुख ई मोबिलिटी ब्रांड नेक्सझु मोबिलिटीने मेड इन इंडिया इलेक्ट्रिक सुपर लॉंग रेंज इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. ‘द न्यू रोडलार्क’ असे तिचे नामकरण केले गेले असून ही सायकल एका फुल चार्ज मध्ये १०० किमी जाईल असा दावा केला जात आहे. या सायकलसाठी मजबूत कोल्ड रोल्ड स्टील फ्रेम, ऑटोमोटीव्ह ग्रेड बिल्ड क्वालिटी व कस्टमर सेंट्रीक फिचर्स दिले गेले आहेत. या सायकलची किंमत ४२ हजार रुपये आहे.

यात रीमुव्हेबल बॅटरी, ड्युअल डिस्क ब्रेक आहेत. कंपनीने यात ८.७ एएमएच च्या रीमुव्हेबल बॅटरी, ५.२ एमएएचचे फ्रेम बॅटरीचा वापर केला आहे. ही बॅटरी घरातही सॉकेटवर चार्ज होणार आहे. पॅडल मोडवर ही सायकल सिंगल चार्ज मध्ये १०० किमी तर रायडिंग रेंज थ्रोटल मोडवर ७५ किमी धावेल असा दावा केला गेला आहे. या सायकलचा सर्वाधिक वेग आहे ताशी २५ किमी. रायडरच्या सुरक्षेसाठी दुहेरी वेंटीलेटेड डिस्क ब्रेक दिले गेले असून वेगवेगळ्या रायडिंग मोड मध्ये दीर्घ प्रवासासाठी युजर गरजेनुसार विविध मोडचा पर्याय वापरू शकणार आहे. या सायकली पुण्याच्या हिंजेवाडी प्रकल्पात तयार केल्या जात आहेत.