कोरोनाचा कहर; संजय राऊतांनी केली दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्याची मागणी


मुंबई – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले असून महाराष्ट्रासह अनेक राज्यांना याचा फटका बसला आहे. कडक निर्बंध महाराष्ट्रात लावण्यात आले असून दिल्लीसोबत इतर अनेक राज्यांनीही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यातच एककीकडे कोरोनाबाधितांची वाढती संख्या तर दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांनी यासाठी केंद्राकडे मदतही मागितली आहे. या देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसंच दोन दिवसांचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात ट्विट करत संजय राऊत यांनी म्हटले आहे की, देशात अभुतपूर्व आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचे वातावरण आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसदेखील नाही. सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसेदचे किमान दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे. जय हिंद!