ब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारत दौरा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द


इंग्लंड – युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा पुन्हा एकदा रद्द झाला असून भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जॉन्सन हे 26 जानेवारीला येणार होते, पण ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला होता.

आता 25 एप्रिलला बोरिस जॉन्सल हे भारतात येणार होते. पण त्यांचा हा दौरा आता अनिश्चित काळासाठी रद्द झाल्याचे बीबीसी न्यूजने आपल्या वृत्तात म्हटले आहे. भारत आणि युनायटेड किंगडमच्या संबंधांबाबत ते व्हिडिओ काँफरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. सध्याचा कोरोना काळ पाहाता पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे. त्याचबरोबर ते भारत दौऱ्यावर या वर्षाच्या अखेरीस येऊ शकतात अशी, माहितीही त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.