अरविंद केजरीवालांनी केली सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा


नवी दिल्ली – कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीतील सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना लॉकडाउन लागू करत असल्याची माहिती दिली. सोमवारी रात्री १० वाजल्यापासून लॉकडाउनच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान यावेळी अरविंद केजरीवाल यांनी कोणीही दिल्ली सोडून जाऊ नये, असे आवाहन केले.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी सकाळी 6 या वेळेत दिल्लीत शनिवार व रविवार विकेंड कर्फ्यूची घोषणा केली होती. केजरीवाल यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विकेंड कर्फ्यूची घोषणा केली होती. विकेंड कर्फ्यू दरम्यान, मॉल, स्पा, जिम, सभागृह इत्यादी ठिकाण बंद राहतील, परंतु थिएटर 30 टक्के क्षमतेसह सुरू असतील असे देखील सांगितले होते.