इस्रायली सैनिकांना दिली जाते सेक्स थेरपी, सरकार करते खर्च

इस्रायल हा एक अद्भूत देश म्हटला पाहिजे. कमी लोकसंख्या असूनही जगावर अनेक बाबतीत वरचढ ठरलेला हा देश. सध्या वेगाने कोविड १९ लसीकरण पूर्ण करणारा देश म्हणून तो चर्चेत आहेच. पण आपल्या अतिशय जखमी झालेल्या सैनिकांना सेक्स थेरपी सरकारी खर्चाने देणारा देश म्हणूनही तो चर्चेत आला आहे. अर्थात देशाच्या या धोरणावर अनेक देशांनी आक्षेप घेतला असल्याचेही सांगितले जात आहे.

जे सैनिक युद्ध अथवा अन्य कामगिरी पार पाडत असताना वाईट प्रकारे जखमी झाले आहेत त्यांना अश्या थेरपीची गरज असल्याचे डॉक्टर सांगतात. बीबीसीने या संदर्भात दिलेल्या रिपोर्ट नुसार सेक्स थेरपीस्ट अश्या सैनिकांना पगारी सरोगेट पार्टनर मिळवून देतात. या लोकांना इंटीमेट रिलेशन कशी बनवायची, सेक्स कसा करायचा याचे अधिकृत प्रशिक्षण दिले जाते. अशी ट्रीटमेंट देणाऱ्या क्लिनिक मध्ये हॉटेलच्या वर सजावट असते. बिछाना, सीडी प्लेअर, शॉवर या सोबत भिंतीवर कामुक चित्रे असतात. सरोगेट पार्टनर स्त्री आणि पुरुष दोन्ही प्रकारात असतात.

अपघाताने किंवा देश कार्य करताना सेक्सची क्षमता हरविलेल्या सैनिकांना ही ट्रीटमेंट दिली जाते, त्यात मजेचा भाग नाही असे डॉक्टर स्पष्ट करतात. अश्या सैनिकांची नावे उघड केली जात नाहीत. ३० वर्षापूर्वी उंचावरून पडल्याने कमरेत लकवा भरलेल्या एका सैनिकाला रक्षा मंत्रालयाने अशी ट्रीटमेंट देण्यासाठी येणारा खर्च केला होता. तेव्हापासून ही ट्रीटमेंट दिली जात असल्याचे समजते.