मुथैया मुरलीधरनवर अँजिओप्लास्टी

श्रीलंकेचा स्टार स्पिनर आणि आता आयपीएल मध्ये हैद्राबाद सनरायझर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक मुथैया मुरलीधरन याच्यावर रविवारी चेन्नई येथे अपोलो रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.  ईएसपीएन क्रिक इन्फोने दिलेल्या माहितीनुसार मुरलीला त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटल मध्ये नेले गेले तेव्हा त्याच्या रक्तवाहिनीत ब्लॉकेज दिसल्याने तेथे स्टेंट टाकून रक्तवाहिनी मोकळी केली गेली. हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यावर तो पुन्हा हैद्राबाद सनरायझर्स टीम मध्ये सामील होणार आहे.

मुरलीने त्याच्या कारकीर्दीत १३४७ विकेट घेतल्या असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये तो सर्वात सफल गोलंदाज मानला जातो. श्रीलंकेसाठी त्याने १३३ कसोटी आणि ३५० वन डे खेळल्या आहेत. कसोटीत त्याने ८०० तर वनडे मध्ये ५३४ विकेट घेतल्या आहेत. २०११ वर्ल्ड कप नंतर त्याने क्रिकेट संन्यास घेतला आहे.