ऑस्ट्रेलिया करोनामुक्त, इस्रायल मध्ये मास्क बंधन नाही

भारतासह जगभरातील देशांत करोनाने हाहा:कार माजविला असताना ऑस्ट्रेलिया आणि इस्रायल मधून एक चांगली बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मारिस स्काटसन यांनी रविवारी ऑस्ट्रेलिया जवळजवळ करोना मुक्त झाल्याची घोषणा केली आहे. अर्थात करोना मुक्ती मिळाली असली तरी ऑस्ट्रेलियाच्या सीमा लगेच अन्य देशांसाठी खुल्या केल्या जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मार्च २०२० पासून ऑस्ट्रेलियन सरकारने देशाच्या सीमा बंद केल्या आहेत.

दुसरीकडे इस्रायलने लसीकरणात जगात आघाडी घेतली आहेच पण सार्वजिनक ठिकाणी नागरिकांना मास्क बंधनातून मुक्तता दिली आहे. फक्त जी सार्वजनिक ठिकाणे बंदिस्त आहेत, उदाहरण थियेटर्स सारखी तेथे मास्क वापरावा लागणार आहे. देशातील शाळा कॉलेजेस पूर्ववत सुरु करण्यात आली आहेत. मे महिन्यापासून पर्यटक इस्त्रायलला भेट देऊ शकणार आहेत असेही सरकारने जाहीर केले आहे. देशात सध्या फक्त २०० करोना संक्रमित आहेत असेही सांगितले जात आहे.