येथे भरतो जगातील सर्वात मोठा फुलांचा बाजार

flower
जगभरातील फुले विक्रीसाठी हॉलंडमध्ये येतात. ट्युलिपची शेती तेथे सर्वात जास्त होते. पण या बाजारपेठेत ट्युलिपशिवाय इतर फुलांचीही विक्री होते. 30 कोटींपेक्षा जास्त फुले हॉलंडमधून रोज जगात पोहचतात. तेथे आल्समीर, नाल्दविज आणि रिजंसबर्ग या तीन मोठ्या फुलांचा लिलाव होतो. 25 लाख फुलांचा एक मिनिटात लिलाव होतो.
flower1
स्टाॅक एक्सचेंजसारखा हा लिलाव होतो. म्हणून वॉल स्ट्रीट ऑफ फ्लाॅवर्स असे हॉलंडला म्हटले जाते. पहाटे 6 वाजता हा लिलाव सुरू होतो. एक युरोपासून हा लिलाव सुरू होतो. विक्रीप्रमाणे किमतीत चढउतार होतात. 35 मोठ्या डिस्प्ले युनिटवर हा लिलाव दिसतो. तीन ठिकाणी डिस्प्ले ट्रेंडिंग रूम असतात. ट्रेंडिंग रूममध्ये की पॅड आणि माॅनिटर लागलेले असतात. फुलांची खरेदी आॅनलाइनही करता येते.
flower2
2 ते 3 तासात ही फुलं 280 स्कुटर ट्राॅली ड्रायव्हर इच्छित ठिकाणी पोचवतात. यासाठी हॉलंडमध्ये वेगळी वाहतूक व्यवस्था आहे. 2.5 लाख फुलं भरलेली ट्राॅली डाॅकवर पोचते. ही प्रक्रिया सकाळी 6 ते 11पर्यंत चालते. सर्वात जास्त फुलांची विक्री जर्मनी (29 टक्के), युनायटेड किंगडम (14 टक्के), फ्रान्स (13 टक्के) या देशासाठी होते. आशियाच्या बाजारात 10 टक्के होते. वाचलेली फुले अमेरिका, रशिया आणि सर्बियामध्ये जातात. ट्युलिप, क्रोकस आणि हायसिंथ या फुलांची विक्री जास्त होते. त्यापाठोपाठ गुलाबांची विक्री होते. अॅमस्टरडॅम येथे फुलांचे फ्लोटिंग मार्केट पाहायला जगभरून पर्यटक येतात.

Leave a Comment