मोत्यांची शेतीतून होते लाखोंची कमाई

peral
उत्तराखंडच्या डेहराडूनमधील रहिवाशी असलेल्या आसिया आपल्या घरी मोत्याच्या शेती करतात. त्या या शेतीच्या माध्यमातून वर्षाकाठी 4 लाख रुपये कमवतात. सरकार अशा प्रकारच्या शेतीसाठी कर्जही देते. या कोर्ससाठी अनेक सरकारी संस्था प्रशिक्षणही देतात. मोत्यांनाही पिकांप्रमाणे नैसर्गिकरित्या तयार केले जाते. हा व्यवसाय छोट्या प्रमाणात सुरू करता येतो. तुमच्याकडे यासाठी 500 स्क्वेअरफीटचा तलाव असणे गरजेचे आहे. तुम्हाला तलावात 100 शिंपले पाळून मोत्यांचे उत्पादन सुरू करता येईल. 15 ते 25 रुपये एका शिंपल्याची बाजारात किंमत आहे. 10 ते 12 हजार रुपये स्ट्रक्चर सेट अपवर खर्च होतील. पाण्याच्या ट्रीटमेंटवर 1000 रुपये आणि 1000 रुपयांची इन्स्ट्रुमेंट्स खरेदी करावी लागतील.
peral1
एका शिंपल्यात 20 महिन्यांनंतर एक मोती तयार होतो. बाजारात त्याची किंमत 300 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली क्वालिटी आणि डिझाइनर मोत्याची किंमत 10 हजारांपर्यंत आहे. एका मोतीची किंमत 800 रुपये जरी मानले तरीही या काळात तुम्ही 80 हजार रुपयांपर्यंत पैसे मिळवू शकता. शिंपल्यांची संख्या वाढवली, तर जास्त फायदा होऊ शकतो. 2 हजार शिंपले तुम्ही पाळले तर खर्च 2 लाख रुपयांपर्यंत कमाई होईल अर्थात, मोती चांगल्या प्रतीचे असायला हवेत.
peral2
चांगल्या शास्त्रीय प्रशिक्षणाची यासाठी गरज असते. ते सरकार देते. सरकारी संस्था किंवा मासेमारी करणारे मच्छिमार यांच्याकडून त्यानंतर शिंपल्यांची खरेदी करावी लागेल. दोन दिवस शिंपल्यांना मोकळ्या पाण्यात सोडावे लागते. म्हणजे त्यांच्यावरचे कवच आणि मांसपेशी सैल होतात. शिंपल्यांना जास्त वेळ पाण्याबाहेर ठेवता येणार नाही. मांसपेशी सैल झाल्यावर शिंपल्यावर शस्त्रक्रिया करून त्यावर 2 ते 3 एमएमचा छेद देऊन त्यात वाळूचा छोटा कण टाकावा लागतो. हा वाळूचा कण जेव्हा शिंपल्याला जोडला जातो तेव्हा तो आतून एक पदार्थ सोडायला सुरुवात करतो.
peral3
नायलाॅनच्या बॅगेत शिंपल्यांना ठेवून ( एका बॅगेत 2 ते 3 ) तलावात सोडले जाते. 15 ते 20 महिन्यांत शिंपल्यात मोती तयार होतात. शिंपल्याचे कवच तोडून मोती बाहेर काढला जातो. इंडियन काॅन्सिल फाॅर अॅग्रीकल्चर रिसर्चप्रमाणे सेंट्रल इन्स्टिट्युट आॅफ फ्रेश वाॅटर अॅक्वाकल्चर मोफत प्रशिक्षण देतात. भुवनेश्वरला याचे मुख्य आॅफिस आहे. तिथे 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. तिथे सर्व काही शिकवले जाते. समुद्रकिनाऱ्यावर मोत्याची शेती केली जाते. तुम्हाला 15 वर्षांसाठी साध्या व्याजावर नाबार्ड आणि इतर कमर्शियल बँका कर्ज देतात. केंद्र सरकार सबसिडी देण्याच्या योजनाही चालवत असते. हा व्यवसाय यशस्वी झाल्यावर तुम्ही मोठी कंपनीही सुरू करू शकता.

Leave a Comment