जगातील काही नामांकित अब्जाधीश आणि त्यांच्या आवडत्या गाड्या

car
अब्जाधीश उद्योगपती म्हटले की धडाडीने चाललेल्या त्यांच्या कंपन्या, त्यांची आलिशान घरे, ऐषारामी जीवनशैली आणि अर्थातच महागड्या आलिशान गाड्या असे दृश्य सर्वसामान्यपणे आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. आलिशान गाड्या संग्रही असणे, हे प्रतिष्ठेचे प्रतीक मानले गेले आहे. तसेच एखाद्याकडे कोणती गाडी यावरून त्याच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज लोक घेत असतात. पण याला अपवाद आहे जगभरातील काही नामांकित अब्जाधीश उद्योगपतींचा. यांच्याकडे अमाप संपत्ती असली, तरी यांची जीवनशैली मात्र अतिशय साधी आहे. त्यांची ही सामान्य जीवनशैली ते वापरत असलेल्या गाड्यांमधूनही दिसून येते.
car1
लोकप्रिय आणि बलाढ्य इ-कॉमर्स कंपनी ‘अॅमेझॉन’ चे सीइओ असलेले जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. एकूण १२८ बिलियन डॉलर्स किंमतीच्या संपत्तीचे मालक असलेल्या बेझोस यांना, त्यांची ‘होंडा अकॉर्ड’ अतिशय प्रिय आहे. ही गाडी त्यांनी १९९६ साली खरेदी केली असून, आजतागायत ते याच गाडीचा वापर करीत असतात. आजच्या काळामध्ये या गाडीची किंमत चार हजार डॉलर्स इतकी आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे पूर्व सीइओ स्टीव्ह बॉलमर चाळीस बिलियन डॉलर्सच्या संपत्तीचे मालक असून, फोर्ड गाड्यांचे प्रशंसक आहेत. २५,००० डॉलर्स किंमतीची ‘फोर्ड फ्युजन हायब्रीड’ ही त्यांची गाडी आहे.
car2
चीनी इ-कॉमर्स कंपनी ‘अलिबाबा’ चे संस्थापक जॅक मा यांचे नाव देखील जगातील अब्जाधीश व्यक्तींच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. जॅकच्या संग्रही roewe RX5 ही एसयुव्ही असून यागाडीची किंमत २५,००० डॉलर्स इतकी आहे. या कारचे निर्माण SAIC आणि अलिबाबा यांच्या एकत्रित परिश्रमांचे फळ असून, या गाडीला ‘इन्टरनेट कार’ म्हटले जाते. या गाडीची ऑपरेटिंग सिस्टम आणि इन्फोटेनमेंट सिस्टम ‘अलीबाबा’द्वारे तयार करण्यात आली आहे. ‘फेसबुक’चे संस्थापक आणि सीइओ मार्क झुकरबर्ग जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असून, त्यांच्या अतिशय साध्या आणि कमी खर्चिक राहणीमानासाठी ओळखले जातात. कपडे, गाड्या, जगभर प्रवास या गोष्टींवर फार पैसा खर्च करणे मार्कला पसंत नाही. त्यांच्या संग्रही ‘अक्युरा tsx’, ‘फोल्क्सवागेन gti’, आणि ‘होंडा फिट’ या गाड्या असून, या सर्वच गाड्यांची किंमत प्रत्येकी तीस हजार डॉलर्सपेक्षा कमी आहे.
car3
बर्कशायर हॅथवे कंपनीचे सीइओ आणि यशस्वी गुंतवणूकदार म्हणून वॉरन बफे प्रसिद्ध आहेत. ऐंशी बिलियन डॉलर्स किंमतीच्या संपत्तीचे मालक असलेले बफे यांच्या संग्रही ‘कॅडीलॅक xts’ ही गाडी आहे. ५५,००० डॉलर्स किंमतीची ही गाडी बफे यांनी २०१४ साली खरेदी केली होती. या पूर्वी बफे यांच्याकडे कॅडीलॅक dts ही गाडी असून, जनरल मोटर्सचे सीइओ मेरी बारा यांच्या आग्रहाखातर बफे यांनी नवी गाडी खरेदी केल्याचे म्हटले जाते. त्यांची जुनी कॅडीलॅक त्यांनी २००६ साली खरेदी केली होती. आपल्या जुन्या गाडीचा लिलाव करून त्यातून मिळालेल्या १२२,५५० डॉलर्सची रक्कम बफे यांनी समाजकल्याणकारी कार्यांसाठी खर्ची घातली.

Leave a Comment