राष्ट्रीय पक्षी मोराविषयी मनोरंजक माहिती

peacock
आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून देखण्या आणि सुंदर मोराची निवड अगदी योग्य आहेच पण भारताप्रमाणेच तो श्रीलंका आणि म्यानमार या देशांचाही राष्ट्रीय पक्षी आहे. २६ जानेवारी १९६३ मध्ये त्याला भारताने राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. मोर हा मोठा पक्षी असून त्याची लांबी साधारण ५ फुट, उंची साधारण दोन फुट असते आणि वजन सरासरी ५ ते ६ किलो असते. त्याच्या शरीराचा ६० टक्के भाग म्हणजे त्याचा पिसारा असतो. हा असा बहुदा एकमेव पक्षी असावा जो मादीपेक्षा म्हणजे लांडोरीपेक्षा देखणा आहे.

peahen
लांडोरीला पिसारा नसतो आणि तिच्या डोक्यावर छोटा तुरा असतो. लांडोरीला आकर्षित करण्यासाठी मोर आकर्षक नृत्य करतो आणि वेगवेगळे आवाज काढतो. पावसात मोर नाचतात तेव्हा त्यांचे पंख तुटतात. ऑगस्ट मध्ये तर पिसारा पूर्ण गळतो पण उन्हाळा सुरु होण्याच्या वेळी त्यांना पुन्हा पिसे येतात. मोर पाळता येतात पण खुल्या जागेत ते अधिक चांगले जगतात. लांडोर अंडी घालताना घरटे बांधत नाही तर सुरक्षित वाटेल त्याजागी अंडी घालते. ती एकावेळी ५ ते ६ अंडी देते. जानेवारी ते ऑक्टोबर हा अंडी घालण्याचा काळ असून ही अंडी चकमदार दिसतात.

green
मोर रात्री उभ्या उभ्या झाडावर झोपतात. त्यांची नजर अतिशय तेज असते तसेच वास घेण्याची क्षमता तीव्र असते. अन्य जंगली प्राणांची चाहूल त्यांना लगेच लागते. मोरांचे आयुष्य २५ ते ३० वर्षांचे असते. मोराचे पंख घरात समृद्धी आणतात असा समज आहे. जेथे मोराची पिसे असतात तेथे साप येत नाहीत. मोराची पिसे सकारात्मक उर्जा देतात. म्हणून अनेक भगत किंवा तत्सम तांत्रिक बाधा झालेल्यांच्या शरीरावरून मोरपिसांचा पंखा फिरवितात. विद्येची देवी शारदा हिचे वाहन मोर आहे त्यामुळे पुस्तकात मोरपिसे ठेवणे शुभ मानले जाते.

white
मोर निळे, हिरवे आणि पांढऱ्या रंगाचे असतात. भारत, नेपाळ आणि श्रीलंकेत निळे, जावा, म्यानमार आणि इंडोनेशिया येथे हिरवे मोर दिसतात. पांढरा मोर अल्बिनो मोर आहे म्हणजे त्याच्यात रंगद्रव्ये नसतात.

Leave a Comment