या ठिकाणी वराला हुंड्यात दिले जातात विषारी साप

dowry
जगभरात लग्नाच्या वेगवेगळ्या चाली-रिती असून त्याहूनही वेगळ्या चाली-रिती आपल्या देशात पाहायला मिळतात. आपल्या देशात हुंड्यावर कायद्याने बंदी असली तरी चोरी-छुप्या मार्गाने हुंडा देण्याची प्रथा सुरुच आहे. त्यात हुंड्याच्या रुपात रोख रक्कम, दागदागिणे, कार किंवा महागड्या वस्तु दिल्याचे आपण पाहिले किंवा ऐकले असेलच. पण आम्ही आज तुम्हाला एका अशा प्रकारच्या हुंड्याची माहिती सांगणार आहोत. ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. आपल्या देशात एक असा समाज आहे ज्यांच्या लग्नात चक्क विषारी साप देण्याची प्रथा आहे. विश्वास नाही ना बसत पण हे खरे आहे.
dowry1
ही प्रथा मध्य प्रदेशच्या गौरिया समाजात सुरु असून तेथील जावयाला सासऱ्याकडून हुंड्यात २१ विषारी साप दिले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा या समाजात सुरु आहे. यामागे असे म्हटले जाते की, एखादी व्यक्ती जेव्हा या समाजातील मुलीला जर लग्नात साप देत नसेल तर त्या मुलीचे लग्न लवकरच तुटते.
dowry2
त्याचबरोबर असेही म्हटले जाते की, मुलीचा बाप लग्न जुळताच जावयाला गिफ्ट देण्यासाठी साप पकडणे सुरु करतो. अनेक विषारी सापांचाही यात समावेश असतो. विषारी सापांची येथील लहान मुलांना देखील अजिबात भीती वाटत नाही. उलट ते या सापांसोबत सहजपणे खेळताना दिसतात.
dowry3
साप पकडणे हा या समाजातील लोकांचा मुख्य व्यवसाय आणि त्यांचे खेळ करणे. हेच कारण आहे की, सासरा जावयाला हुंड्यात साप देतात. जेणेकरुन या सापांच्या माध्यमातून तो कमाई करु शकेल आणि परिवाराचे पोट भरु शकेल. सापांना सुरक्षित ठेवण्यासाठी या समाजात काही कठोर नियमही केले आहेत. असे म्हटले जाते की, त्यांच्या टोपलीत जर साप मरण पावला तर संपूर्ण कुटुंबातील लोक टक्कल करतात. सोबतच समाजातील लोकांना जेवणही द्यावे लागते.

Leave a Comment