ह्या देशांमधील महिला सर्वात सुंदर


जगभरातील अनेक देशांमधील महिला त्यांच्या अवर्णनीय लावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ह्या देशांतील सामान्य मुली देखील इतक्या देखण्या आहेत, की त्यांचे सौंदर्य पाहून सुंदर अभिनेत्रींची, मोठमोठ्या जागतिक पातळीवरील सौंदर्य स्पर्धा जिंकलेल्या सौंदर्यवतींचा देखील सहजी विसर पडावा. रँडम स्टोरी डॉट कॉम नामक वेबसाईट ने याच अनुषंगाने सर्वेक्षण केले असता, त्यांनी एका यादीच्या द्वारे कोणकोणत्या देशांमधील महिला अतिशय सुंदर आहेत याची माहिती जाहीर केली आहे.

ह्या यादीनुसार सर्वप्रथम आहे लॅटव्हिया हा देश. ह्या देशामधील महिलांना ‘ब्युटीफुल ब्लॉन्डस्’ असे ही म्हटले जाते. केवळ ह्या महिलांचे सौंदर्यच नाही, तर ह्यांची बोलण्याची पद्धत, ह्यांचे हावभाव देखील अतिशय आकर्षक समजले जातात. त्यानंतर आहे स्वीडन हा देश. ह्या देशातील महिलांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली असते असे म्हटले जाते. त्यामुळेच ह्या देशातील महिला देखील अतिशय आकर्षक समजल्या जातात. उंचपुऱ्या, सडपातळ, भुरे केस असणाऱ्या, निळ्या डोळ्यांच्या या महिला अतिशय सुंदर समजल्या जातात.

ब्राझील देशातील महिला त्यांच्या ‘स्पोर्टी लुक’ करिता प्रसिद्ध आहेत. ह्या देशामध्ये गोऱ्या व सावळ्या ह्या दोन्ही वर्णांच्या स्त्रिया तितक्याच सुंदर आणि आकर्षक आहेत. ब्राझील मधील महिला जागतिक पातळीवरील सौंदर्यस्पर्धांमध्ये नेहमीच अग्रणी राहिल्या आहेत. स्पेन देशाच्या महिला त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे आकर्षक समजल्या जातात. ह्या महिलांना फॅशन बद्दल उत्तम ज्ञान असते, आणि त्याचा वापर त्या आपल्या दैनंदिन आयुष्यातील पोशाखांमध्ये उत्तमरीत्या करीत असतात. ह्या महिलांना उन्हामध्ये ‘टॅन’ होणे आवडते. तसेच फिटनेसचा बाबतीत ह्या महिला अतिशय दक्ष असतात.

रशिया देशातील महिला सुंदर निळे डोळे आणि उत्तम शरीरसौष्ठवासाठी ओळखल्या जातात. तर फ्रांस देशातील महिला, त्यांचे बहिर्मुखी व्यक्तिमत्व आणि सकारात्मक विचारसरणी मुळे आकर्षक समजल्या जातात. भारतीय महिला देखील इतर देशांतील महिलांच्या मानाने तसूभरही कमी नाहीत. भारतामध्ये हर तऱ्हेचे वर्ण आणि रूप असणाऱ्या सौंदर्यवती महिला आहेत. भारतातील महिला अतिशय आकर्षक समजल्या जातात. इटली देशातील महिलांना ‘ बेला ‘ म्हणून ओळखले जाते. इटालियन महिला अतिशय देखण्या समजल्या जातात. त्यांच्या उत्तम फॅशन सेन्स करिता ह्या महिल्या ओळखल्या जातात.

अर्जेन्टिना देशातील महिला अतिशय ‘रोमँटिक’ समजल्या जातात. उंच आणि काहीश्या सावळ्या दिसणाऱ्या ह्या महिला अनेक सौंदर्यस्पर्धांमध्ये विजेत्या होताना पाहायला मिळतात. साउथ अफ्रिका देशातील महिला देखील अतिशय आकर्षक समजल्या जातात. अतिशय खेळकर व्यक्तिमत्वाच्या आणि फिटनेसच्या बाबतीत खूपच दक्ष असणाऱ्या अश्या ह्या महिला आहेत.

Leave a Comment