जागतिक इतिहासातील काही क्रूर शासनकर्त्या राण्या


जगाच्या इतिहासामध्ये अश्या अनेक राण्या होऊन गेल्या, ज्यांनी आपल्या राष्ट्राच्या प्रेमाखातर आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे त्या राण्या अजरामर झाल्या. पण काही राण्या अशाही होऊन गेल्या ज्यांनी सत्तेसाठी आपल्या आप्तस्वकीयांचे, अगदी आपल्या पतीचे प्राणही घेण्यास मागेपुढे पहिले नाही. या राण्या जागतिक इतिहासातील सर्वात क्रूरकर्मी राण्या म्हणून ओळखल्या गेल्या.

विषकन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लियोपात्राने इजिप्तच्या राजाशी विवाह केला खरा, पण राज्याची सत्ता आपल्या हाती यावी या करिता तिने आपल्या पतीचे प्राण घेतले आणि स्वतः त्याच्या जागी येऊन राज्यकारभार सांभाळू लागली. क्लियोपात्रा आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती. तिचे अभूतपूर्व सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी ती सापांचे विष प्राशन करीत असे, असे म्हटले जाते. ही राणी स्वतःला देवाचा अवतार मानीत असे. आपल्या म्हणण्याप्रमाणेच सर्व कारभार व्हायला हवा, या आग्रहाखातर तिने राज्यातील लोकांचा अतोनात छळ केला.

वू जि तिआन ह्या राणीने चीनवर सर्वात जास्त काळ राज्य केले. ह्या राणीला दोन पती होते. या राणीने स्वतःच आपल्या मुलीला गळा दाबून ठार मारले आणि त्याचा आरोप आपल्या दोन्हीही पतींवर लावला. दोन्ही पतींना आपल्या रस्त्यातून हटविल्यानंतर ह्या राणीने आपल्या मुलाच्या मदतीने चीनवर राज्य केले. कॅथरीन द ग्रेट ही रशियाची सम्राज्ञी होती. या राणीनेही सत्ता हस्तगत करण्यासाठी आपल्या पतीची हत्या करविली. यानंतर तिने सर्व सत्ता आपल्या हातामध्ये घेतली. कॅथरीन ला कलेची जाण होती, त्यामुळे तिच्या सत्तेच्या काळामध्ये राज्यामधील कलेचा पुष्कळ विकास झाला.

तुर्कस्तानवर एके काळी तुरहान आणि तिची सासू कोसेम यांचे राज्य होते. दोघी सासू-सून मिळून राज्यकारभार बघत असत. पण तुरहानला आपल्या सासूचा हस्तक्षेप अजिबात पसंत नसे. त्यामुळे तुरहानने आपल्या मुलाच्या मदतीने क्रूर कट रचून त्यामध्ये आपल्या सासूची, म्हणजेच कोसेमची हत्या करविली. त्यानंतर तुरहानने राज्यकारभार पूर्णपणे स्वतःच्या हाती घेतला.

एम्प्रेस वई ही किंग झांगजोंग याची दुसरी राणी होती. हिने ही सत्तेच्या मोहापायी विष देऊन आपल्या पतीची हत्या करविली. त्यानंतर तिने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. पण ह्या सत्तेचा उपभोग ती फार काळ घेऊ शकली नाही. तिच्या पुतण्याने तिची हत्या करून सर्व सत्ता आपल्या हातामध्ये घेतली.

Leave a Comment