ही तरुणी त्या लोकांसाठी उत्तम उदाहरण आहे जे जीवनात हार मानतात

jessica-cox
अमेरिकेतील एक तरुणी त्या लोकांसाठी उत्तम उदाहरण आहे जे आपल्या जीवनात हार मानतात. त्या तरुणीचे नाव जेसिका कॉक्स असून ती जगातली पहिली ब्लॅक बेल्ट आणि एकुलती एक आर्मलेस पायलट आहे. आपल्या पायांनी जेसिका विमान उडवते. जगातली ती पहिली लायसन्स असलेली आर्मलेस पायलट असून तिचे नाव यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.
jessica-cox1
१९८३ साली अमेरिकेतील अ‍ॅरिझोनामध्ये हात नसलेल्या स्थितीतच जेसिकाचा जन्म झाला होता. तिने सुरुवातीला कृत्रिम हातांचा वापर केला. पण तिने १४ वर्षांची झाल्यावर कृत्रिम हातांना दूर केले आणि सर्व कामे पायांनी करु लागली. वयाच्या २२व्या वर्षी जेसिकाने विमान उडवणे शिकले होते आणि तिला केवळ ३ वर्षात लायसन्सही मिळाले.
jessica-cox2
आपल्या पायांचा वापर जेसिका हातांप्रमाणेच करते. पायांच्या मदतीने ती कार चालवते, गॅस भरते, डोळ्यांच्या लेन्सेस लावते, स्कूबा डायव्हिंग करते आणि पायांनीच कीबोर्डवर टायपिंग सुद्धा करते. २४ शब्द प्रति मिनिट असा तिचा टायपिंग स्पीड आहे.
jessica-cox3
सर्फिंग, स्कूबा डायविंग, घोडेस्वारी आणि प्लेन उडवण्याची ३४ वर्षीय जेसिकाला आवड आहे. कीबोर्डवर टायपिंग करण्यासोबतच ती पायांच्या बोटांमध्ये पेन धरुन लिहिते सुद्धा. त्याचबरोबर स्वत: शूजची लेसही बांधते.
jessica-cox4
जेसिका विवाहित असून तिचे जेव्हा लग्न झाले तेव्हा तिच्या होणारा पती पॅट्रिक चेंबरलेनने तिला पायातच रिंग घातली होती. जेसिका एक मोटिवेशनल स्पीकरही आहे. खरंच जेसिकाच्या हिंमतीला आणि जिद्दीला सलाम करावा असेच तिचे जगणे आहे.

Leave a Comment