जेवढ्या वेगाने आली त्याच वेगाने ओसरणार करोनाची दुसरी लाट?

भारतात करोनाची दुसरी लाट ज्या वेगाने आली त्याच वेगाने ती ओसरेल असा निष्कर्ष नुकत्याच केल्या गेलेल्या संशोधनातून काढण्यात आला आहे. या संशोधनानुसार ज्या वेगाने करोनाचा प्रसार होत आहे ते पाहता एप्रिल अखेरीपर्यंत ४० टक्के नागरिकांत अँटीबॉडीज विकसित झालेल्या असतील.

मिळालेल्या माहितीनुसार गतवर्षी डिसेंबर अखेरपर्यंत २१ टक्के नागरिकांच्यात अँटीबॉडीज विकसित झाल्याचे दिसून आले होते. एप्रिल अखेरी आणखी ७ टक्के नागरिकात अँटीबॉडीज विकसीत होतील. लसीकरणामुळे १२ टक्के नागरिकात प्रतिकारशक्ती येण्याची अपेक्षा आहे. यामुळे ४० टक्के नागरिक मृत्यूच्या धोक्याबाहेर असतील असे सांगितले जात आहे.

२८ टक्के नागरिकात संक्रमणामुळे आपोआप करोना प्रतिरोधक क्षमता येईल आणि १३ टक्के नागरिकांना एप्रिल अखेर लसीकरणाचा पाहिला डोस दिला गेलेला असेल. दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकात ८७ टक्के ५० वर्षाच्या पुढचे आहेत असेही दिसून आले आहे.

लान्सेट या प्रसिद्ध वैद्यकीय मासिकात मात्र भारताने करोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी त्वरित उपाययोजना केली नाही तर जून २०२१ पर्यंत रोज १७५० ते २३२० रुग्ण मृत्युमुखी पडतील असा इशारा दिला आहे.