बीसीसीआयच्या सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये विराट, रोहित व बुमराहचा समावेश


नवी दिल्ली – ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडुंचे वार्षिक करार जाहीर केले असून सर्वाधिक कमाई करणारे विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह हे खेळाडू ठरले आहेत. ए प्लस श्रेणीत तिघांनीही स्थान राखले असून वर्षाला त्यांना सात कोटी रुपये मिळणार आहेत. खेळाडुंची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

ए श्रेणीत रवीचंद्रन अश्विन, चेतश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, के एल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शामी, इशांत शर्मा, ऋषभ पंत व रविंद्र जाडेजा यांनी स्थान मिळवले असून त्यांना पाच कोटी रुपये मिळणार आहेत. बी श्रेणीत पाच खेळाडू असून यामध्ये मयंक अगरवाल, वृद्धीमान साहा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव व शार्दुल ठाकूर यांचा समावेश असून त्यांना तीन कोटी रुपये मिळतील.

तर चौथ्या किंवा सी श्रेणीमध्ये दहा जणांना स्थान मिळाले असून यामध्ये कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज व शुबमन गिल यांना स्थान मिळाले असून त्यांना एक कोटी रुपये वार्षिक मानधन मिळणार आहे.

बीसीसीआयने करारबद्ध केलेल्या खेळाडूंची यादी

  • अ+’ श्रेणी (७ कोटी) : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमरा
  • ‘अ’ श्रेणी (५ कोटी) : रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या.
  • ‘ब’ श्रेणी (३ कोटी) : वृद्धिमन साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, मयांक अगरवाल
  • ‘क’ श्रेणी (१ कोटी) : कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेंद्र चहल, मोहम्मद सिराज.