केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकरांना कोरोनाची लागण


मुंबई – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अजूनच वेगाने होत आहे. कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्यांपासून ते अगदी राजकीय मंडळींपर्यंत सर्वजण सापडत आहेत. दरम्यान आज(शुक्रवार) केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री व भाजप नेते प्रकाश जावडेकर यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


याबाबतची माहिती स्वतः जावडेकर यांनी ट्विट करत दिली आहे. मी कोरोनाबाधित झालो असून मागील दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे जावडेकर यांनी म्हटले आहे.