सिटी बँकेचा भारतातून काढता पाय


मुंबई : आता आपला व्यवसाय भारतातून जगातील आघाडीच्या बँकिंग कंपन्यांपैकी एक असलेली सिटी बँक गुंडाळणार आहे. त्यासाठी बँक तयारी देखील करीत आहे. भारतातील ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा अमेरिकन सिटी बँकेने गुरुवारी केली. तथापि, बँकेने हा निर्णय घेतल्यामुळे खातेदार आणि कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम होणार आहे.

क्रेडिट कार्ड, बचत बँक खाती आणि वैयक्तिक कर्ज यासारख्या विभागांचा सिटी बँकेच्या किरकोळ व्यवसायात समावेश आहे. भारतातील रिटेल बँकिंगमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर सिटी बँकेकडून सांगण्यात की, ते त्याच्या जागतिक रणनीतीचा एक भाग आहे. सिटी बँकने जागतिक पातळीवर निर्णय घेतला आहे की ते 13 बाजारातून आपल्या या व्यवसाय बाहेर पडणार आहे. आता केवळ काही श्रीमंत देशांवर सिटी बँक लक्ष केंद्रीत करणार आहे.

बँकेच्या ग्राहक बँकिंग व्यवसायात क्रेडिट कार्ड्स, रिटेल बँकिंग, गृह कर्जे आणि संपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश आहे. सिटी बँकेच्या देशात 35 शाखा आहेत आणि ग्राहक बँकिंग व्यवसायात सुमारे 4,000 लोक काम करतात. सिटी बँकेचे ग्लोबल सीईओ जेन फ्रेझर म्हणाले की, या भागांमध्ये स्पर्धा नसल्यामुळे बँकेने तसे करण्याचा निर्णय घेतला आहे. सिटी बँकच्या किरकोळ व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी नियामक मान्यता आवश्यक असतील.

सिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशु खुल्लर म्हणाले की, त्वरित आमच्या कामांमध्ये बदल झालेला नाही आणि या घोषणेचा आमच्या सहकाऱ्यांवर तातडीने परिणाम होणार नाही. आमच्या ग्राहकांच्या सेवेत आम्ही कोणतीही कमतरता ठेवणार नाही. पुढे ते म्हणाले की या घोषणेमुळे बँकेच्या सेवा आणखी मजबूत करण्यात येतील. संस्थात्मक बँकिंग व्यवसायाव्यतिरिक्त सिटी मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई आणि गुरुग्राम केंद्रांमधून जागतिक व्यवसायावर लक्ष केंद्रीत करेल. 1902 मध्ये सिटी बँकने भारतात प्रवेश केला आणि 1985मध्ये बँकेने ग्राहक बँकिंग व्यवसाय सुरु केला.

आपल्या नवीन व्यवसाय धोरणांतर्गत सिटी बँक भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, बाहारिन, चीन, दक्षिण कोरिया, मलेशिया, फिलिपाइन्स, पोलंड, रशिया, तैवान, थायलंड आणि व्हिएतनाममधील किरकोळ बँकिंग व्यवसायातून बाहेर पडेल. पण त्यांचा घाऊक व्यवसाय सुरुच राहील. मीडिया रिपोर्टनुसार, सिटी बँक आपला भारतातील किरकोळ आणि ग्राहकांचा व्यवसाय विकण्यासाठी खरेदीदारांचा शोध घेत आहे.