असंख्य देशातील बंदी झेलून टिकटॉकचे झांग ६० अब्ज डॉलर्सचे मालक

व्हिडीओ शेअरिंग टिकटॉक संस्थेचे चौथे भागीदार झांग यिमिंग जगातील धनकुबेराच्या यादीत सामील झाले आहेत. ब्लूमबर्गच्या बिलीनेअर इंडेक्स नुसार टिक टॉकचे स्वामित्व असलेल्या बाईटडान्सचे बाजारमूल्य २५० अब्ज डॉलर्सवर गेले आहे. ३८ वर्षीय यीमिंग या कंपनीत चौथे भागीदार आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी खुद्द चीन सोबत भारत, अमेरिकेसह अन्य काही देशांनी टिकटॉकवर बंदी घातली होती. तरीही या अडचणींचा सामना करून बाईटडान्सने ही प्रगती केली आहे.

यामिंग धनकुबेर यादीत सामील झालेच आहेत पण त्यांनी यामुळे टेन्सेट होल्डिंगचे पोनो मा, नोग्फूचे मालक जोंग शैनशेन व अमेरिकेच्या वॉलटन परिवाराशी बरोबरी केली आहे. यामिंग हे दीर्घ काळाची धोरणे आखण्यासाठी विशेष ओळखले जातात. छोट्या लहान अडचणींना ते कधीच घाबरत नाहीत असे त्यांना जवळून ओळखणारे सहकारी सांगतात. काही तज्ञांच्या मते बाईटडान्स लवकरच ४०० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.