केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती : NEETPG – 2021 परीक्षा देखील पुढे ढकलली


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. केंद्र सरकारने नुकत्याच सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलेला असताना, आता NEETPG – 2021 परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने NEETPG – 2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. १८ एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती. नंतर परीक्षेची नवीन तारीख ठरवली जाणार आहे. मेडिकल विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट केले आहे.