किरीट सोमय्यांच्या आरोपांना मुंबई पालिका आयुक्तांचे पुराव्यानिशी सणसणीत उत्तर


मुंबई : रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा मुंबईत कोरोनाच्या परिस्थिती जाणवत असतानाच मुंबई महानगरपालिकेवर रेमडेसीवीर इंजेक्शन खरेदी गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी पुराव्यानिशी सणसणीत उत्तर दिले आहे.

एकीकडे रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा राज्यात जाणवत असताना सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधी पक्षातील नेते सुद्धा राज्याला रेमडेसीवीर इंजेक्शन कसे मिळतील यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेवर रेमडेसीवीर इंजेक्शन जास्त दरात खरेदी केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला होता.

रेमेडेसेवीर जास्त दरात मुंबई महापालिकेने खरेदी केल्या या आरोपावर पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी खुलासा केला आहे. जरी कमी पैशात इंजेक्शन घेण्याची प्रक्रिया हॉपकिन्स इन्स्टिट्यूटने केली असेल तरी त्यांना अजूनही इंजेक्शन उपलब्ध झालेली नाही. मुंबई महापालिका प्रमाणे सुरत, सातारा, मध्यप्रदेश इथल्या पालिकांनीही मुंबई महापालिकेने घेतलेल्या किमतीमध्ये इंजेक्शन घेतल्याचा खुलासा चहल यांनी केला आहे.

त्याचबरोबर केवळ मुंबईलाच नाही तर सर्वांना त्याच दरात मायलान या कंपनीने इंजेक्शन दिले आहे. तब्बल 2 लाख कुप्प्या मुंबई महापालिकेने मागवलेल्या आहेत, त्यापैकी 60 हजार उपलब्ध झाल्या आहेत आणि उर्वरित येत्या काळात मिळणार असल्याची माहितीही चहल यांनी दिली. पुराव्या दाखल इतर राज्यांनी आणि महापालिकेने त्याच किंमतीमध्ये रेमेडीसीवीर इंजेक्शन खरेदी केल्याचे खरेदी खत महापालिका आयुक्तांनी जाहीर केले आहे.

मुंबई महानगरपालिकेला पत्र लिहून रेमडेसीवीर इंजेक्शन खरेदीवरून भाजप नेते किरीट सोमय्या आणि विनोद मिश्रा यांनी आरोप केला होता. रेमेडेसीवीर खरेदीत मुंबई महापौरांनी घोटाळा केला. राज्य सरकारची हाफकिन इन्स्टिट्यूट रेमेडेसीवीर इंजेक्शन 565 रुपयाला घेते, तर मुंबई महापालिका 1568 रुपयाला घेते. या इंजेक्शनची ठोक बाजारातील किंमत 1200 रुपये आहे. एवढा फरक कसा? असा सवाल उपस्थितीत केला होता.