अजय देवगण घेऊन येत आहे सत्य घटनेवर आधारित चित्रपट


बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण सध्या आपल्या कामांमध्ये चांगलाच व्यस्त आहे. एकीकडे त्याच्या हातात संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठीयावाडी’ या चित्रपटाचा प्रोजेक्ट आहे. तर दुसरीकडे तो ‘मेडे’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय देवगण करत असून हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रकुल प्रित यांची अजय देवगण दिग्दर्शित ‘मेडे’ या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. त्याचबरोबर या चित्रपटात अजय देवगणदेखील एका भूमिकेत झळकणार आहे. पुढील वर्षी म्हणजेच 22 एप्रिल 2022 ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या संदर्भात बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार 2015 सालात घडलेल्या दोहा कोची विमान दुर्घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. अजय देवगण या चित्रपटात एका वैमानिकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

2020 मध्य़ेच या चित्रपटाचे शूटिंग सुरु करण्यात आले होते. चित्रपटाचे बरेचसे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे उर्वरित शूटिंग लवकरच पूर्ण करण्यात येणार होते. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे शूटिंग पुन्हा पुढे ढकलण्यात आले आहे.