स्मार्टफोन युजर्सची प्रायव्हसी धोक्यात- चेकपॉइंट

स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे फोन हाय सिक्युरिटी लेव्हलचे आहेत असा दावा करत असल्या तरी नुकत्याच केलेल्या एका पाहणीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. चेकपॉइंट सिक्युरिटी फर्मने केलेल्या पाहणीत असे आढळले आहे की सध्याच्या १० मधले चार स्मार्टफोन हॅकर्स आरामात हॅक करू शकतात. याचाच अर्थ १० पैकी ४ युजर्सची प्रायव्हसी धोक्यात आहे.

या फर्मचा असा दावा आहे की २०२० मध्ये जगात ९७ टक्के संस्था मोबाईल सायबर अॅटॅकच्या शिकार झाल्या होत्या तर ४६ टक्के संस्थातील किमान एका कर्मचाऱ्याने व्हायरस असलेले अॅप डाऊनलोड केले होते. करोना मुळे रुजलेल्या वर्क फ्रॉम होम संस्कृतीमुळे हॅकर्सचे काम आणखी सोपे झाले आहे. जगातल्या ४० टक्के स्मार्टफोन चीपसेट मध्ये असलेल्या दोषाचा फायदा हॅकर्स घेत आहेत. २०२० मध्ये बँकिंग ट्रोझन मध्ये १५ टक्के वाढ झाली आहे. यामुळे युजर्सची बँकेतील खासगी माहिती लिक झाली आहे.

कोविड १९ ची माहिती देण्याचा नावावर अनेक अॅप्स लोकांची फसवणूक करत आहेत. ही अॅप्स फोन मध्ये व्हायरस पसरवीत आहेत, मोबाईल रिमोट एक्सेस ट्रोझन, बँकिंग ट्रोझन व प्रीमिअर डायलर सारखी अॅप युजर्सच्या परवानगी शिवायच इन्स्टॉल होत आहेत. वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढल्याने २०२४ पर्यंत ६० टक्के कर्मचारी मोबाईलवर शिफ्ट होतील असा अंदाज आहे.

यामुळे बहुतेक कामे स्मार्टफोनवरूनच केली जातील. टेकपॉइंटच्या रिपोर्ट नुसार मालवेअर पसरविण्यासाठी इंटरनॅशनल कार्पोरेशन मोबाईल डिव्हाईस मॅनेजमेंट(एमडीएम) सिस्टीमचा वापर केला जातो त्यातून ७५ टक्के मोबाईल मॅनेज केले गेले आहेत.