आता तूटू लागले कोरोनाबाधितांच्या वाढीचे नकोसे विक्रम


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा फार वेगाने वाढू लागला आहे. देशात दररोज कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा पाहता, कोरोनाबाधितांच्या वाढीचे नकोसे विक्रमही आता तुटू लागले आहेत. या संदर्भात केंद्रीय आरोग्य विभाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनामुळे 1 हजारहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

देशभरात मागील 24 तासांत 1,84,372 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 1027 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान 82,339 कोरोनाबाधितांनी मागील 24 तासांत कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. यापूर्वी सोमवारी 1,61,736 कोरोनारुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यातच काल नव्या रुग्णांची पडलेली भर पाहता आता कोरोना देशात विदारक रुप धारण करु लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

देशभरात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता विविध राज्यांमध्ये कमी-जास्त स्वरुपात निर्बंध लागू करत लॉकडाऊनसदृश परिस्थिती पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात पुढील 15 दिवस संचारसबंदीचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. राज्यातील जनतेला मंगळवारी संबोधित करत असताना त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे आहे. आज रात्री 8 वाजेपासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे. कुणालाही आवश्यक कामाशिवाय बाहेर फिरता येणार नाही. ही संचारबंदी पुढील 15 दिवसांसाठी लागू असणार आहे. मंगळवेढा-पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर त्याठिकाणी निर्बंध लागू होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.