पुढच्या ईदला सलमानच्याच तीन चित्रपटात स्पर्धा?

करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रात नवीन टीव्ही मालिका, सिनेमा शुटींग बंद केले गेले आहे तसेच नवे चित्रपट रिलीज करण्यास सुद्धा निर्माते तयार नाहीत. त्यामुळे दरवर्षी ईद रोजी नवीन चित्रपटाचा रिलीज करणाऱ्या सलमानच्या ‘राधे, युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा प्रतीक्षित चित्रपट या वर्षीच्या ईद ला रिलीज होण्याची शक्यता धुसर झाली आहे. स्वतः सलमाननेच करोनाचा वेग असाच वाढता राहिला तर चित्रपटाचे प्रदर्शन पुढील वर्षावर जाईल असे संकेत दिले आहेत.

याचाच अर्थ पुढच्या वर्षी साधारण २ मे रोजी ईद असेल. त्यावेळी सलमानचे तीन चित्रपट एकदम रिलीज होतील आणि त्यांच्यातच स्पर्धा होईल. यशराज फिल्म्स कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण करत आहे त्यामुळे आदित्य चोप्रा टायगर तीनची निर्मिती करत आहेत. त्याचबरोबर शाहरुखच्या पठाण मध्येही सलमान झळकतो आहे. राधे साठी पुढच्या ईदचा मुहूर्त गाठला गेला तर हे तीन चित्रपट एकाच वेळी एकमेकांशी टक्कर घेतील.