मध्य रेल्वेची महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा


मुंबई : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने थैमान घातलेले असून मध्य रेल्वनेही त्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीसपर्यंत 106 स्पेशल ट्रेनची घोषणा रेल्वेने केली आहे. यात राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर ते उत्तर भारतातील शहरांमध्ये जाणाऱ्या ट्रेन्सचा समावेश आहे. यासोबतच गरज पडल्यास ट्रेन्सची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

फक्त कनफर्म टिकीट असणाऱ्यांनाच प्रवासाची रेल्वेने परवानगी दिली आहे. परंतु प्रवाशांची संख्या वाढल्यास डुप्लीकेट ट्रेन चालवण्यात येऊ शकतात. मुंबई ते गोरखपूर दरम्यान सोमवारी मध्य रेल्वेने डुप्लीकेट ट्रेन चालवली होती. राज्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता, सरकारक़डून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी क़डक लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे विस्तापित मजूरांनी आपआपल्या गावी जाण्यास स्टेशन्सवर गर्दी केली आहे.