सेंट्रल बँक ऑफ इंडियाची कोरोना लस घेणाऱ्यांसाठी खास योजना


मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. लसीकरणाची मोहिम देखील देशभरात जोरात सुरू आहे. कोरोना लसीकरणात जास्तीत जास्त नागरिकांनी भाग घ्यावा यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेत आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया देखील सहभागी झाली असून लसीकरणासाला प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना आणली आहे.

यासाठी एक योजना देखील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने आणली आहे. ज्या नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहेत, त्यांना एफडीवर ०.25 टक्के जास्तीचे व्याज मिळणार आहे. या योजनेचे नाव इम्यून इंडिया डिपॉजिट आहे.

त्या नागरिकांना बॅंकेच्या या योजनेचा लाभ ज्यांनी कोरोना लसीचा पहिलाचा डोस घेतला आहे. या योजनेचे वैशिष्टये असे की ज्येष्ठ नागरिकांनादेखील त्यांच्या एफडीवर मिळत असलेल्या व्याजापेक्षा 0.50 टक्के अधिक व्याज मिळणार आहे.


सोशल मीडियावर पोस्ट करत या योजनेची माहिती बँकने दिली आहे. या योजनेची मॅच्युरिटी मुदत 1,111 दिवसांची आहे. ही योजना मर्यादित काळासाठी असणार आहे. या योजनेंतर्गत कोरोना लस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के व्याज मिळणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना लसीकरणात भाग घ्यावा, तसेच लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणली आहे.