सिंगापूर मध्ये घरपोच दुध, अंडी देणारा रोबो ‘ कॅमेलो”

सिंगापूर मध्ये स्पेशल रोबो ‘कॅमेलो’ चा वापर दुध, अंडी, भाज्या असे आवश्यक सामान गरजू नागरिकांना घरपोच मिळावे यासाठी सुरु झाला आहे. या रोबोची एक वर्ष ट्रायल घेतली जात असून सध्या ७०० घरात तो रोजच्या जीवनावश्यक वस्तूंची डिलीव्हरी देत आहे. जगभरात कोविड संक्रमणात प्रचंड वेगाने वाढ होत असल्याने नागरिकांना आवश्यक सामान घरपोच मिळावे यासाठी ड्रोन डिलीव्हरी सारखे पर्याय वापरले जात आहेत. त्यात आता या रोबोची भर पडली आहे.

सिंगापूरच्या OTSAW DIGITAL ने हा रोबो तयार केला आहे. त्याचे नामकरण कॅमेलो असे केले गेले आहे. अॅपच्या माध्यमातून अंडी, दुध, भाज्या बुक करता येतात. त्यानंतर रोबो त्या घरपोच देतो. घराजवळ किंवा ठरलेल्या पिक पॉइंट जवळ आल्यावर रोबो नोटीफिकेशन देतो.

या रोबो मध्ये थ्री डी सेन्सर, कॅमेरा, २ कंपार्टमेंट दिली गेली असून त्यातून २० किलो सामान नेता येते. दिवसात अशा ४-५ डिलीव्हरी हा रोबो देऊ शकतो. शनिवारी हाफ डे डिलीव्हरी दिल्या जातात. प्रत्येक डिलीव्हरी दिल्यानंतर कॅमेलो अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या मदतीने स्वतःला सॅनीटाइज करून घेतो. जे नागरिक काही कारणांनी बाजारात जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हा रोबो म्हणजे वरदान आहे.