मार्क झुकेरबर्गच्या सुरक्षेवर झाला १७१ कोटींचा खर्च

जगातील सर्वात बडी सोशल मिडिया कंपनी फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबार्ग यांच्या सुरक्षेवर कंपनीने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. नवीन रिपोर्ट नुसार २०२० मध्ये मार्कच्या सुरक्षेवर २.३ कोटी डॉलर्स म्हणजे १७१ कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. याचा एक अर्थ असा की मार्कच्या सुरक्षेवर दररोज ४६ लाख रुपये खर्च झाला आहे. फेसबुकनेच सिक्युरिटी व एक्स्चेंज कमिशनला ही माहिती दिली आहे.

यातील ९९ कोटी घर आणि खासगी सुरक्षेवर खर्च झाले आहेत तर बाकी ७२ कोटी अतिरिक्त सुरक्षेवर खर्च झाले आहेत. कोविड १९ मुळे प्रवास प्रोटोकॉल, अमेरिकेतील निवडणूक काळातील सुरक्षा कव्हरेजमुळे हा जादा खर्च करावा लागल्याचे आणि तो खर्च योग्य आणि गरजेचा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

मार्क वार्षिक पगार म्हणून फक्त १ डॉलर घेतो. बोनस, इक्विटी, पुरस्कार वा अन्य भत्ते तो घेत नाही असाही खुलासा कंपनीने केला आहे. नुकतीच फेसबुकच्या ५३.३० कोटी युजर्स डेटा लिकची घटना घडली असून फेसबुकच्या इतिहासात हा सर्वात मोठा डेटा लिक प्रकार आहे.