सुपर डान्सरसाठी शिल्पा शेट्टी परिक्षक म्हणून घेते एवढे मानधन


सध्या डान्स रियालिटी शोमध्ये सोनी टिव्हीवरील ‘सुपर डान्सर 4’ प्रेक्षकांचे बऱ्यापैकी मनोरंजन करत आहे. शोमधील एका पेक्षा एक स्पर्धक, होस्ट, परिक्षकांची मस्ती यासर्व गोष्टींमुळे ‘सुपर डान्सर 4’ शो तुफान चर्चेत आहेत. पण या शोसाठी परिक्षक असणाऱ्या सेलिब्रेटींचे मानधन ऐकून तुम्ही नक्की चक्करावाल यात काही शंका नाही. एका एपिसोडसाठी परिक्षक लाखो रूपये मानधन घेतात. गीता कपूर अर्थात गीता माँ, अनुराग बासू यांच्यापेक्षा अभिनेत्री शिल्पा शेट्टी अधिक मानधन घेते.

कायम आपल्या सौंदर्य आणि अदांनी शिल्पा शेट्टी चाहत्यांना घायाळ करते. योगा मास्टर आणि फिटनेस फ्रिक असलेली शिल्पा शोमध्ये परिक्षकाची भूमिका पार पाडण्यासाठी एका एपिसोडसाठी तब्बल 18 लाख रूपये मानधन स्वीकारते. पण यंदाच्या शोसाठी ती 20 लाख रूपये मानधन एका एपिसोडसाठी स्वीकारत आहे.

शिल्पानंतर गीता कपूर आणि अनुराग बासूचा नंबर लागतो. गीता एका एपिसोडसाठी 15 लाख रूपये स्वीकारते, तर अनुराग बासू एका एपिसोडसाठी 10 लाख रूपये घेतो. शोचे होस्ट देखील एका एपिसोडसाठी चांगलीच रक्कम घेतात. शोच्या होस्टमुळे प्रत्येक एपिसोड रंगतदार होतो.

टीव्ही अभिनेता, मॉडेल आणि डान्सर ऋत्विक एका एपिसोडसाठी 5 लाख रूपये तर परितोष त्रिपाठीला (मामाजी)एका एपिसोडसाठी 4 लाख रूपये मिळतात.