येत्या दिवसात ठाकरे सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ एक राजीनामा देतील- रामदास आठवले


मुंबई – अनिल देशमुख यांच्या वसूली प्रकरणी विरोधकांकडून राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर जोरदार टीका केली गेली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याच पार्श्वभुमीवर रविवारी महाविकास आघाडीवर निशाणा साधत येत्या दिवसात त्यामधील मंत्री एकापाठोपाठ एक राजीनामा देतील असे त्यांनी म्हटले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आठवले यांनी असे म्हटले आहे की, अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लावला आहे. त्यामुळे देशमुखांच्या चौकशी संदर्भात नोटीस सुद्धा त्यांना धाडण्यात आल्या. मला असे वाटते अशा प्रकारच्या आणखी काही नोटीसा सुद्धा धाडल्या पाहिजे, असे आठवले यांनी म्हटले आहे. तर एकामागोमाग एक उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्री सुद्धा राजीनामा देतील. अखेर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल.

सीबीआयकडून रविवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन पीएची चौकशी करण्यात आली. त्यांना त्यावेळी परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर जे आरोप लावले ते सत्य आहेत का त्याबद्दल विचारण्यात आले. सीबीआयकडून या दोघांना एकाच दिवशी समन्स धाडण्यात आले होते. 5 एप्रिलला अनिल देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला होता. तर अनिल देशमुखांनी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये प्रत्येक महिन्यात वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे.

या व्यतिरिक्त आठवले यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात असे म्हटले की, लॉकडाऊन लावणे गरजेचे आहे कारण गर्दी कमी होईल. त्याचसोबत हे सुद्धा महत्वाचे आहे की याचा फटका मजूरांना बसता कामा नये. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून योग्य ती पावले उचलली जात नसल्याचे ही आठवले यांनी म्हटले आहे. न्यायासाठी ज्योतिबा फुले आणि भीमराव आंबेडकर यांनी लढा दिला. त्यांची जयंती लक्षात घेता पंतप्रधानांनी लसीकरण उत्सवाचा जो निर्णय घेतला मी त्यांच्या स्वागतासह अभिनंदन करतो.