सुझुकीची नवी स्पोर्ट्स बाईक हायाबुसा लवकरच भारत बाजारात

सुझुकी मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची आगामी नवी स्पोर्ट्स बाईक हायाबुसा भारतीय वेबसाईटवर लिस्ट केली गेली आहे. ही आयकॉनिक बाईक लवकरच भारतीय बाजारात दाखल होत असल्याचे संकेत मिळत आहेत. रीट्यून्ड इंजिनसह अपडेटेड डिझाईन व नवीन फिचर्स या बाईक मध्ये ग्राहकाला मिळणार आहेत. बीएस ६/ युरो ५ इमिशन रेग्युलेशन सह ही नवी बाईक येत आहे.

शेवटच्या हयाबुसाची भारतीय बाजारातील किंमत १३.७ लाख रुपये होती. नवी हायाबुसा अपडेटेड मॉडेल साधारण एक्स शो रूम १७ लाखात उपलब्ध होईल असे समजते. कंपनीने बाईकच्या किमतीची अधिकृत घोषणा अद्यापी केलेली नाही.

२०२१ सुझुकी हायाबुसाला १३४० सीसीचे लिक्विड कुल, डीओएचसी, १६ व्हॉल्व, इन लाईन चार इंजिन दिले गेले आहे. हायाबुसा बाईक दमदार इंजिन आणि सुपर फास्ट स्पीड साठी जगभरात ओळखल्या जातात. नव्या हयाबुसाचा टॉप स्पीड ताशी २९९ किमी असून पहिल्या बाईक पेक्षा तिचे वजन दोन किलोनी कमी आहे. या बाईक मध्ये अनेक हायटेक फिचर्स दिली गेली आहेत. नवीन स्लीप व असिस्ट क्लच, बॉश ६ अॅक्सिस, इनर्शियल मेजरमेंट युनिट यांचा यात समावेश असून हे युनिट डायनामिक्स सतत मॉनीटर करते.