ब्राझील मध्ये उभारली जात आहे जीझस ख्राईस्टची दुसरी उंच प्रतिमा

जगातील सात आश्चर्यात सामील असलेल्या ब्राझील मधील ‘ख्राईस्ट द रिडीमर’ या प्रतिमेपेक्षा उंच आणखी एक प्रतिमा ब्राझील मध्ये उभारली जात आहे. यामुळे जगातील सात आश्चर्यापैकी एका मूर्तीच्या पेक्षा उंच प्रतिमा उभारणारा ब्राझील जगातील पाहिला देश बनला आहे.

ब्राझीलच्या रिओ द जानेरो मध्ये उभारली गेलेली ‘ख्राईस्ट द रिडीमर’ मूर्तीची उंची ३० मीटर आहे आणि ही प्रतिमा ख्रिश्चन धर्माचे वैश्विक प्रतिक बनली आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटन येत असतात. त्यामुळे रिओ द जानेरो शहराला जागतिक पर्यटन नकाशावर येण्यास मोठा हातभार लागला आहे.

नव्याने उभी राहत असलेली मूर्ती ‘ख्राईस्ट द रिडीमर’ पेक्षा १३ मीटरने उंच म्हणजे ४३ मीटर उंचीची आहे. एन्काहाडो येथे ही मूर्ती उभी राहत असून रविवारी २८ मीटरवर या मूर्तीच्या हातांचे निर्माण कार्य पूर्ण केले गेले. २०१९ पासून या मूर्तीचे काम सुरु आहे आणि ‘ख्राईस्ट द रिडीमर’ च्या ऑक्टोबर मध्ये येत असलेल्या ९० व्या स्थापना दिवशी ते पूर्ण केले जाणार आहे. या मूर्तीसाठी २.६१ कोटी रुपये खर्च येत आहे. खर्चाची पूर्ण रक्कम देणग्या मधून गोळा केली गेली असल्याचे सांगितले जात आहे.