देशातील या बाजारात तुम्ही किलोच्या भावाने घेऊ शकता कपडे

cloth
नवी दिल्ली- देशात अशी अनेक मार्केट आहेत जिथे तुम्ही अतिशय कमी किमतीत कपडे विकत घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला देशातील अशा मार्केटची माहिती तुम्हाला देणार आहोत जिथे किलोच्या भावाने कपडे मिळतात.
cloth1
दिल्लीचे कॅनॉट प्लेस- सेकंड हँड कपडे मजनू का टिला, रघुबीर नगर, करोल बाग, इंद्रपुरी, इंद्रलोक, भरत नगर, लाल किला, चांदनी चौक, पश्चिम पुरी, ईस्ट दिल्लीसारख्या भागात मिळतात. किलोच्या भावाने ईस्ट दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी कपडे मिळतात. 20 रूपयांपासून 300 रूपयांपर्यंत कपडे या मार्केटमध्ये मिळतात. यात शर्ट, पँट, जिन्स, ड्रेस, सूट-सलवार, जॅकेट इत्यादी कपडे मिळतात. या बाजारातील अनेक दुकानात वेगवेगळे कपडे मिळतात. तुम्ही याठीकाणी बार्गेनदेखील करू शकता. तुम्ही याठीकाणी किलोच्या भावाने कपडे विकत घेऊ शकता. येथे तुम्ही 10 किलोपासून 50 किलोच्या बंडलमध्येही कपडे घेऊ शकता.
cloth2
सेकंड हँड कपडे भारतात इम्पोर्ट होतात. कोणीतरी वापरलेले हे कपडे असतात. या कपड्यांना सेकंड हँड कपडे विकत घेणारे व्यापारी विकत घेतात आणि त्यांना ड्रायक्लिनींग करून पुढे मार्केटमध्ये विकतात. भारतात हे सर्व कपडे चीनकडून पाठवण्यात येतात. कॉमर्स मिनिस्ट्रीच्या आकड्यांनुसार भारत देशातील टॉप 5 देशांपैकी आहे, जे संकड हँड कपडे इम्पोर्ट करतात.
cloth3
मुंबई कोलाबा मार्केट – स्वस्त दरात कपडे मुंबईमध्ये कोलाबा मार्केट आणि क्रॉफोर्ड मार्केटमध्ये विकल्या जातात. येथे कलरफूल कुर्ते, काफ्तान, जिन्स, शर्ट इत्यादी कपडे मिळतात. स्वस्त कपडे क्रॉफोर्ड मार्केटमध्येही मिळतात. 50 रूपयांपासून 300 रूपयांपर्यंत हे कपडे मिळतात. कोलाबा मार्केट सोबतच, मुंबई चोर बाजार, दक्षिण मुंबईचे मटन स्ट्रीट, मोहम्मद अली रोड याठीकाणी सेकंड हँड कपड्यांचे मार्केट आहे. हे मार्केट अंदाजे 150 वर्षे जुने आहे. या बाजाराला सुरुवातील शोर बाजार म्हटले जात होते, कारण मोठ्याने आवाज करून येथील व्यापारी कपडे विकत होते. पण या शोरला इंग्रज चोर असा उच्चार करत होते त्यामुळे या मार्केटचे नाव चोर बाजार पडले. येथे कपडे, ऑटोमोबाईल्स पार्ट्स आणि ब्रँडेड घड्याळांच्या रेप्लीका आणि विंटेज आणि अँक सामानदेखील मिळते.
cloth4
चिकपेटे मार्केट बंगळुरू – रविवारी हे मार्केट बंगळुरूच्या चिकपेटे परिसरात भरते. तुम्ही येथे स्वस्त दरात कपडे घेऊ शकतात. फक्त कपडेच नाही तर येथे तुम्ही गुड्स, ग्रामोफोन, जुने गॅजेट्स, कॅमरा, अँटीक, इलेक्ट्रॉनिक आयटम आणि जिम इक्विमेंटदेखील मिळतात.

Leave a Comment