उन्हाळ्यामध्ये वापरण्याकरिता महिलांसाठी खास फुटवेअर


उन्हाळ्यामध्ये महिला निरनिराळ्या ड्रेसेस सोबत निरनिराळ्या फुटवेअरचे पर्याय देखील विचारामध्ये घेऊ शकतात. त्यामुळे फुटवेअर द्वारे देखील तुम्हाला स्वतःचे खास ‘ स्टाईल स्टेटमेन्ट ‘ व्यक्त करता येईल. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये आरामदायक, हवेशीर आणि वजनाला हलक्या कपड्यांच्या सोबत आकर्षक फुटवेअर खरेदी करण्याचा विचार अवश्य करावा. ह्या आकर्षक फुटवेअर मुळे तुम्ही कोणत्याही ठिकाणी आणि कुठल्याही प्रसंगी आकर्षक दिसाल. अगदी ऑफिस पासून ते पार्टी पर्यंत, कॉलेज पासून आऊटिंग पर्यंत सर्वच ठिकाणी तुमचे फुटवेअर आकर्षक ठरेल.

जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन पोषाखामध्ये रंगांची विविधता आवडत असेल, तर ह्या इंडिगो रंगाच्या फ्लॅटस् अतिशय आकर्षक दिसतील. कॉटन साडी किंवा पंजाबी सूट, कुर्ता, किंवा फ्युजन आऊटफिट्स सोबत हे फुटवेअर अतिशय शोभून दिसेल. जर फॉर्मल लुक आवडत असेल, तर तुम्ही मोकासीन्सचा वापर करू शकता. हे फुटवेअर फॉर्मल आणि कॅज्युअल दोन्ही लुक्स साठी शोभून दिसते. जर तुम्ही पारंपारिक वेशभूषा करणार असाल, तर मोजडी, किंवा जुती शोभून दिसेल. आजकाल निरनिराळ्या रंगांमध्ये आणि डिझाइन्स मध्ये जुती उपलब्ध आहेत.

जर तुम्हाला ‘हील्स’ म्हणजे उंच टाचांचे फुटवेअर आवडत असेल, तर नेहमीचे ब्लॅक किंवा ब्राऊन रंग सोडून, उन्हाळ्यामध्ये शोभतील असे हलके रंग वापरा. ब्ल्यू, येलो, पर्पल, बेज असे रंग आजकाल खूपच लोकप्रिय होत आहेत. ह्या रंगांमध्ये उपलब्ध असणारे हील्स निवडावेत. तसेच इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा फुटवेअर आरामदायक असणे तुमच्या दृष्टीने जास्त महत्वाचे असेल, तर ओपन टो स्लीपर्सचा वापर करावा.

Leave a Comment