फेंगशुईमध्ये ‘जपानी मांजरी’चे आहे खास महत्व

feng-shui
भारतामध्ये, एखादे वेळी जर मांजर रस्त्यातून आडवी गेली, तर तो अपशकून मानला जात असतो. किंबहुना घरामध्ये मांजरीचे वास्तव्यच अशुभ मानले गेले आहे. मात्र जपानी वास्तुशास्त्र, किंवा फेंगशुईनुसार, जपानी मांजरीची प्रतिकृती अतिशय शुभ समजली गेली आहे. जपानी मांजराची प्रतिकृती घराच्या प्रवेशद्वारावर लावल्याने घरामध्ये शांतता, सुबत्ता, समृद्धी येत असल्याचे फेंगशुई म्हणते. त्यामुळे जपानी लोक आपल्या घरांच्या किंवा व्यवसायांच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर लाफिंग बुद्ध, क्रिस्टल्स आणि ‘लकी कॅट’, म्हणजेच मांजरीची प्रतिकृती लावतात. या लकी कॅटला ‘मनी कॅट’ म्हणजे संपत्ती प्राप्त करून देणारी मांजर असे ही म्हटले जाते. ही मांजर शुभ कशी समजली जाऊ लागली यामागील इतिहास मोठा रोचक आहे.
feng-shui1
जपानी पुरणकथांच्या नुसार, एकदा धनदेवता एका नगराचे भ्रमण करण्यास निघाले असता अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. पावसातून आडोसा मिळविण्यासाठी धनदेवतेने एका झाडाचा आश्रय घेतला. तोच त्यांची नजर थोड्या दूरवर एका कोपरऱ्यामधे बसलेल्या मांजरीकडे गेली. ती मांजर त्यांना जवळ बोलाविण्यासाठी खुणावते आहे असा भास त्यांना झाला. धनदेवता मांजरीच्या जवळ जाण्यासाठी झाडाच्या आडोश्यातुन बाहेर पडले मात्र, त्या झाडावर एकदम वीज कोसळली आणि त्या तडाख्याने ते भले थोरले झाड खाली कोसळले. मांजरीने बोलाविल्याने आपण त्या झाडाखालून निघालो, आणि म्हणूनच आपले प्राण वाचले हे धनदेवतेच्या लक्षात आले. त्यामुळेच त्या मांजरीच्या मालकाला त्यांनी आशीर्वाद दिल्याने त्याला भरघोस धनप्राप्ती झाली.
feng-shui2
काही काळानंतर या मांजरीचे निधन झाले, आणि या मांजरीच्या मालकाने मांजरीचे दफन केल्यानंतर तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ हात हलवून बोलाविणाऱ्या मांजरीची प्रतिकृती बनवविली. या मांजरीला त्याने ‘मानकी निको’ असे नाव दिले. या मांजरीची आणि तिच्यामुळे तिच्या मालकाला धनप्राप्ती झाल्याची कहाणी सर्वश्रुत झाल्याने या मांजरीची प्रतिकृती घरामध्ये ठेवणे शुभ मानले जाऊ लागले. ही प्रतिकृती अनेक रंगांमध्ये उपलब्ध असून, प्रत्येक रंगाप्रमाणे याचे मिळणारे फल ही निरनिराळे असते. आर्थिक प्रगती होऊन घरामध्ये आणि व्यवसायात प्रगती व्हावी या करिता घराच्या वर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सोनेरी रंगाची मांजरीची प्रतिकृती लावली जाते, तर धनप्राप्ती सातत्याने, अखंड होत राहावी या करिता निळ्या रंगाची प्रतिकृती लावली जाते. ही प्रतिकृती दक्षिण-पूर्वेला लावली जाते.
feng-shui3
सौभाग्य अखंड राहावे या करिता हिरव्या रंगाची प्रतिकृती लावली जात असून, ही उत्तर-पूर्व दिशेला लावली जाते. तर सुखी दाम्पत्यजीवनासाठी दक्षिण-पश्चिम दिशेला लाल रंगाची मांजरीची प्रतिकृती लावली जाण्याची पद्धत जपान देशामध्ये रूढ आहे.

Leave a Comment