मोसमानुसार बदला पोशाख

पोशाख नेहमीच आपल्या  फॅशन स्टेटमेंटचा महत्वाचा भाग राहिला आहे. त्यामुळेच सर्वात जास्त प्रयोग आपण पोशाखांवर करतो. तुम्हीही बदलत्या मोसमानुसार चांगला ड्रेस शोधत असाल तर या टिप्स तुम्हाला तुमचा परफेक्ट ड्रेस निवडण्यात उपयुक्त होऊ शकतात. तुम्हाला स्टाइलिश ड्रेसेस आवडत असतील तर ऋतूमध्ये बदल झाला आहे. यामुळेच  ड्रेसेसचाही ट्रेंड  बदलला आहे. जर वॉर्डरोब अपडेट करीत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवून खरेदी करा.

प्रिंट्सवर भर द्या
या ऋतूमध्ये प्लेन ड्रेसऐवजी प्रिंटेड ड्रेस फॅशनवर भर द्या. यात तुम्ही रूंद  प्रिटचा ड्रेस निवडू शकता. त्यातही माल्टिकलर्ड प्रिंट्सचे ड्रेस सर्वात जास्त पसंत केले जात आहेत. मुळात, असे ड्रेस तुमच्या बॅग आणि  शूजशी सहजपणे  मॅच होतील. तुम्ही ड्रेसवर ट्रायबल प्रिंट्स घेऊन  लहरीसारखे प्रिंट्स डिजाइन करू शकता.

बॉडी फिटेड ड्रेसेस
लूज ड्रेसेस उन्हाळ्यात चांगले वाटतात. मात्र या  ऋतूत तुम्ही बॉडी फिट ड्रेसेस आरामात घालू शकता. तुमची उंची कमी असेल तर छोटे प्रिंट्स असणारे ड्रेस घाला. फिटेड ड्रेसमध्ये फिगर उठून दिसते. यात तुम्ही  टी-शर्ट, फिटेड स्कर्ट, शर्ट व टयूनिक वगैरे घेऊ शकता. त्यासोबत पेंसिल फिटेड जीन्स व कॅप्रीही खरेदी करू शकता.

ब्राइट शेड्स
तुम्हाला प्रिंटेड ड्रेस नको असतील तर ब्राइट कलरचे  ड्रेस निवडा. ब्राइट शेड्समध्ये ऑरेंज, पिंक व रेड विशेष लोकप्रिय आहे. याशिवाय, ब्राइट ब्लूही या ऋतूसाठी परफेक्ट आहेत.  या रंगांचे  ड्रेस खूप सुंदर दिसतात.

ड्रेस कॉम्बिनेशन
तुम्ही प्रिंटेड ड्रेस परिधान करणार असाल तर त्यासोबत  प्लेन जॅकेट किंवा मॅचिंग प्लेन स्टोल घेऊ शकता. प्रिंटेड ड्रेसबरोबर  एकाच रंगाचे दागिने वापरू शकता.  या मोसमात टॉप टु बॉटम मॅचिंगचा  ट्रेंड नाही. तुम्ही फुटवेयर्स, बॅग व ज्वेलरीला ड्रेसशी मॅच करू शकता. प्लेन ड्रेसबरोबर कलरफुल ज्वेलरी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.

फॅब्रिकमध्ये ऑप्शन
या ऋतूत तुम्ही कोणत्याही प्रकारचे फॅब्रिक वापरू शकता. यात वेलवेटपासून ते क्रेपपर्यंत कॅरी केले जाऊ शकते. याशिवाय  नेट, जॉर्जेट, शिफॉन व लेस वगैरेदेखील परिधान करू शकता.
 
नी-लेंथ ड्रेसची वाढती मागणी
तुम्हाला वेस्टर्न ड्रेसेसची आवड असेल तर नी-लेंथ ड्रेस घेऊ शकता. सध्या तरुणींना नी-लेंथ ड्रेस फार पसंत आहेत. त्यामुळेच  नी-लेंथ ड्रेसला सर्वात जास्त मागणी आहे. यातही  डिफरेंट कट्स व पॅटर्न बाजारात उपलब्ध आहेत.  तसेच तुम्हाला सूट आदी ट्राय करायचा असेल तर फिटेड नी-लेंथ सूट वापरू शकता. हे तुम्ही लेगिग्स आणि  कॅप्रीबरोबर परिधान करू शकता. वेस्टर्न ड्रेसेसमध्ये वन पीसमध्ये टयूनिक व बलून ड्रेसचा  ट्रेंड आहे.  लॉन्ग टी-शर्ट हाही चांगला पर्याय आहे.

Leave a Comment