तहान, थकवा आणि मूळव्याधीवर करता येणारे उपचार

thkawa

आजच्या जीवनपद्धतीत वेग अधिक महत्त्वाचा घटक ठरतो आहे. वेळ नाही आणि कामे तर उरकायलाच हवीत अशा चिमटीत आपण सापडलो आहोत. त्यामुळे वेळेवर खाणे, पुरेसे पाणी पिणे आणि आवश्यक तेवढी विश्रांती घेणे शक्य होत नाही. मात्र शरीर या अनियमिततेबद्दल आपल्याला कधीच माफ करत नसते. त्यातूनच किरकोळ वाटणारी पण त्रासदायक दुखणी सुरू होतात. त्यावर हे उपचार करावेत.

१) उन्हाळे लागणे- उन्हाळयात बर्‍याच वेळा लघवीच्या जागी जळजळ होते. यालाच उन्हाळे लागणे म्हणतात. यावर नारळाचे पाणी, ताक, संत्र्याचे रस भरपूर प्यायल्याने फरक पडतो.

२) सतत तहान लागणे- श्रीखंड खाल्ल्याने सतत तहान लागणे कमी होते. तेलकट पदार्थ खाल्ल्याने लागत असेलली तहान ही श्रीखंड खाल्ल्याने कमी होते.

३) मूळव्याध- मूळव्याधीचा त्रास होत असलेल्यांनी मुळा आणि  कांदा यांची दही घातलेली कोशिबीर ८ दिवस १ वाटी या प्रमाणात खावी. कोशिबीर खाल्यापासून ८ तासातच आराम पडतो. तरीही आठ दिवस खावी.

४) थकवा नाहीसा करणे- अतिश्रमाने आलेला थकवा नाहीसा करण्यासाठी उन्हाळयाच्या दिवसात गार पाण्याने तर हिवाळयाच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करावी. दमणूक कमी करायची असेल तर अननस आणि मोसंबी यांचा रस एकत्र करून प्यायल्यानेही थकवा नाहीसा होतो.

५) रक्तस्त्राव ताबडतोब थांबण्यासाठी-जखमेतून खूप रक्तस्त्राव होत असेल तर तेथे काताची बारीक पूड भरावी. रक्तस्त्राव थांबतो. शरीराच्या कोणत्याही अंतर्गत इंद्रियात होणारा रक्तस्त्राव, काताची पावडर १ चमचा  तांब्याभर पाण्यात कालवून हे पाणी थोडे थोडे प्यायला दिल्याने हमखास थांबतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment