इंटरनेटशी मुलांची ओळख – फायदा की तोटा ?

kids

इंटरनेटशिवाय संगणक केबल नसलेल्या टीव्हीसारखा आहे. मुलांसाठीही इंटरनेट माहितीचे महत्त्वाचे स्त्रोत बनले आहे. मात्र त्याचे काही धोकेदेखील आहेत. निरागस मुले जिज्ञासेपोटी नको त्या साईटवर जाणे हा सर्वात मोठा धोका.

एकेकाळी ग्रंथालयात जाऊन मुले इनसाइक्लोपीडिया किंवा जाडजुड पुस्तकांतून माहिती शोधत असत. आता कोणतीही माहिती एका क्लिकने मिळविता येते. जी काही माहिती पाहिजे ती गूगलला विचारा, लगेच उत्तर मिळेल.

मात्र हेच इंटरनेट मुलांसाठी धोकायदायकदेखील बनू पाहते आहे. इंटरनेटवरची सर्व माहिती नेहमी १०० टक्के खरी आहे, अथवा नाही याचा अंदाज लावणे कठीण असते. सोशल नेट्वर्किंग साइटवर अज्ञात लोकांशी मैत्रीने बलात्कार आणि खून यासारख्या गुन्ह्यांना जन्म दिला आहे. त्याशिवाय पोर्न वेबसाइट पाहण्यापासून मुलांना कसे रोखावे, ही आई-वडिलांसमोर मोठी समस्या आहे.

सॉफ्टवेयरची मदत
जर्मनीत असले प्रकार रोखण्यासाठी आणि इंटरनेट मुलांसाठी सुरक्षित बनविण्यासाठी ’’किंडर सर्वर’’ अर्थात, मुलांचे सर्वर लॉन्च केले गेले आहेत. हे एक सॉफ्टवेयर आहे. ते घर किंवा शाळेतील कॉम्प्यूटरवर टाकता येते आणि मुलांसाठी अनावश्यक असलेल्या वेबसाइट लॉक करता येतात. बाजारातही ’’नेट नॅनी’’ अथवा ’’साइबर सिटर’’ नामक अशाप्रकारचे सॉफ्टवेयर उपलब्ध आहेत.

जर्मनीतील एक ब्लॉगर टॉर्बन फ्रीडरिष यांच्या मते, तुम्ही या सॉफ्टवेयरची तुलना हेलमेटशी करू शकता. मात्र मुलांना सायकल चालविता येत नसेल तर हेलमेटचा काय उपयोग. अशाप्रकारचे सॉफ्टवेयर खूप लहान मुलांसाठी काम करते, ज्यांना अद्याप कॉम्प्यूटर नीटपणे वापरता येत नाही. म्हणजे त्यांनी संगणक शिकणे  नुकतेच सुरु केले आहे.

सुरक्षेची हमी नाही
जर्मनीतील प्रसिद्ध ब्लॉगर जॉनी होएजलर यांच्याही मते, हे सॉफ्टवेयर मुलांची सुरक्षा निश्चित करू शकत नाहीत. अलीकडेच त्यांनी आपल्या पत्नीसोबत इंटरनेट सुरक्षेबाबत एक पुस्तक लिहिले आहे. त्यात म्हटले की, कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, कोणत्याही प्रकारचा सल्ला, जगातील आई वडीलांना आपल्या मुलांना जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीत १०० टकके सुरक्षित ठेवण्यात यशस्वी होत नाही.

मात्र तरीही या सॉफ्टवेयरचे फायदे पूर्णतः नाकारले जाऊ शकत नाहीत. सॉफ्टवेयर बनविणार्या् कंपन्यांनी काळानुसार ते अपडेट केले पाहिजे. त्यासाठी त्यांना दररोज इंटरनेटवर नजर ठेवावी लागते. हिंसाचार किंवा पोर्नशी संबंधीत अनेक नवीन वेबसाइट इंटरनेटमध्ये येतात, या फिल्टरना या सर्वांबाबत माहित असणे गरजेचे आहे. अनेक फिल्टर वेबसाइटमध्ये वापरली जाणारी भाषादेखील लक्षात घेतली पाहिजे. जसे की एखाद्या वेबसाइटमध्ये खून, मृत्यू, भूक यासारखे शब्द वापरले असतील तर फिल्टर त्यांना हटवितो.

Leave a Comment