अचानक मिळालेला पैसा दुःखास कारणीभूत?

पैशाने सारे विकत घेता येते असे सर्रास म्हटले जाते. मात्र सार्यानच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत. उदाहरणार्थ आनंद, समाधान हे पैशाने विकत घेता येत नाही. कांही जणांना ही बाब खरी न वाटण्याचा संभव आहे कारण शेवटी कोण कशात आनंद मानतो हे कसे कळणार? मात्र असे असले तरी टेंपल विद्यापीठातील मानसशास्त्र तज्ञ फ्रँक फर्ले यांची निरीक्षणे कांही वेगळेच निष्कर्ष समोर आणत आहेत.

फ्रँक यांनी लॉटरी लागून अचानक पैसा मिळालेल्या २२ विजेत्यांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना असे आढळले की लॉटरीचा प्रंचड पैसा हाती आल्यानंतर हे लोक आनंदी नाहीत. कारण ? पैसा आनंद आणू शकत नाही मात्र तुम्हाल अटेंशन मिळवून देतो. त्यामुळे होते काय की कांही लोकांसाठी तुम्ही आर्थिक टार्गेट बनता. आजपर्यंतच्या जीवनात कधींही अनुभवले नसतील असले प्रसंग तुमच्या वाट्याला येतात. तुम्ही जे करू पाहाल त्यात अपयशच जास्त येते. परिणामी जवळच्या व्यक्ती तुम्हाला सतत उपदेश करत राहतात आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात उलथापालथ होते.

इतकेच नव्हे तर मोठ्या रकमेच्या लॉटर्‍या लागणार्यांथना लुबाडणूक होण्याचे प्रकारही जास्त प्रमाणात घडतात असेही फ्रँक यांना अनुभवास आले. अचानक मिळालेला पैसा आनंदाऐवजी मानसिक अस्वस्थता आणतो असा यातून त्यांनी निष्कर्ष काढला. अर्थात म्हणजे पैसा मिळवायचा नाही असा मात्र याचा अर्थ नाही. पैसा लॉटरीतून मिळविण्याऐवजी भरपूर कष्ट करून मिळवायचा म्हणजे त्याची खरी किंमतही कळते आणि केलेल्या कष्टाचे चीज होते व परिणामी समाधान नक्की लाभते.

Leave a Comment